छत्रपती शिवाजी महाराज जयंती : कोसारे महाराज
छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. जगातील एकमेव राजा असा आहे ज्याचा जन्म आणि मृत्यू किल्ल्यावरच झाला तो राजा म्हणजेच छत्रपती श्री शिवाजी महाराज प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले, शत्रूंना सदा परतून तूच लावले हल्ले धर्म रक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी, हे शिवराय प्रणाम तुजला कोटी-कोटी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आपणास व आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा
छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख :
कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, कोणी दुखावले असेल तर त्याला सुखाची वाट दाखवा, जग जिंकायचं असेल तर उदाहरण शिवाजी महाराजांचे द्या शिवाजी' या नावाला कधी उलट वाचले आहे का? 'जीवाशी' असा शब्द तयार होतो. जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी होय! छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखत नसेल असं महाराष्ट्रात कोणी व्यक्ती नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच स्वराज्य निर्माणाची चाहूल राजमाता जिजाऊ यांच्यामुळे झाली
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी कसे पडले :
एका आख्यायिकेनुसार राजमाता जिजाऊ यांनी शिवनेरी गडावरील शिवाई देवीला एक नवस मागितले की जर मला पुत्र झाला तर मी त्याचे नाव शिवाजी असे ठेवीन.
शहाजीराजे भोसले :
छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील म्हणजे शहाजीराजांनी आपली निष्ठा वेळोवेळी आदिलशाही निजामशाही आणि मुघल यांच्या दरम्यान बदलत राहिली.
मलिक अंबर या निजामशाहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर 1636 मध्ये मोगल सम्राट शहाजहानच्या सैन्याने अहमदनगर चाल करून अहमदनगर शहर आपल्या ताब्यात घेतले.शहाजीराजे नंतर आदिलशहाच्या दरबारात सरदार म्हणून रुजू झाले.आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. नंतर लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या.
मात्र शहाजी राजांनी पुणे हे आपली जहागिरी ठेवली आणि स्वतःची लहानशी फौज नेहमी पदरी बाळगली.
शहाजीराजे भोसले प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या राज्यामध्ये एक सरदार म्हणून होते.
राजमाता जिजाऊ :
छत्रपती शिवाजी महाराज 14 वर्षाचे असताना शहाजी राजांनी पुण्याची जहागीर राजमाता जिजाऊ यांच्या स्वाधीन केली. राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज कुशल अधिकाऱ्यांसह पुण्यात आले.
निजामशाही, आदिलशाही, मुघल यांच्या सततच्या हितसंबंधांमुळे पुण्याची अवस्था अत्यंत वाईट झाली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी राजमाता जिजाऊवर होती.
छत्रपती शिवाजी महाराजांचे शिक्षण :
युद्धाभ्यास आणि रणनीती तसेच राज्यकारभार यासंबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून मिळाले.
दप्तर व्यवस्था व न्यायव्यवस्थेचे शिक्षण त्यांना दादोजी कोंडदेव मलठणकर यांच्याकडून मिळाले.
परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण राजमाता जिजाऊ यांच्याकडून मिळाले.
राजमाता जिजाऊ यांच्या कडून युद्धकला व राजनीतिशास्त्राचे शिक्षण दिले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे लग्न :
राणी सईबाई (Chatrapati Shivaji Maharaj Wife Name) आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा बालपणातच 16 मे 1640 रोजी लाल महाल पुणे येथे झाला.
तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज 10 वर्षाचे होते आणि सईबाई निंबाळकर या 7 वर्षाच्या होत्या.
छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी सईबाई यांना चार मुले झालीत.
त्यातील पहिल्या तीन मुली होत्या आणि चौथे मुलगा होता.
सखुबाई, राणूबाई, अंबिकाबाई आणि नंतर छत्रपती संभाजी महाराज हे होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव सगुणाबाई हे आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे लग्न सगुणाबाई सोबत 1641 मध्ये झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे तिसऱ्या पत्नीचे नाव सोयराबाई हे आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे लग्न सोयराबाई सोबत 1650 मध्ये झाले.
पुतळाबाई भोसले या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौथ्या पत्नी आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि पुतळाबाई यांचा लग्न 15 एप्रिल 1653 रोजी झाले.
पुतळाबाई पालकर हे नेताजी पालकर यांच्या बहिण आहे. पुतळाबाई यांना कोणतेही मूल झाले नाही.
राणी लक्ष्मीबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाचव्या पत्नी आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे लग्न लक्ष्मीबाई सोबत 1656 च्या आधी झाले.
राणी सकवारबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहाव्या पत्नी आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे लग्न सकवारबाई सोबत जानेवारी 1657 मध्ये झाले.
काशीबाईसाहेब भोसले ह्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सातव्या पत्नी आहे.
काशीबाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह 8 एप्रिल 1657 रोजी झाला.
गुणवंताबाई भोसले ह्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आठव्या पत्नी आहे.
गुणवंताबाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह 15 एप्रिल 1657 रोजी झाला.
स्वराज्याची पहिली मोहीम :
छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1647 मध्ये वयाच्या 17व्या वर्षी आदिलशाहीच्या ताब्यात असलेल्या तोरणा गड जिंकला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा गड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले असे म्हटले जाते.
त्याच वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा उर्फ सिंहगड आणि पुरंदर किल्ला आपल्या ताब्यात घेऊन पुणे प्रांतावर पूर्णपणे आपले नियंत्रण मिळवले.
तोरणा गडावर छत्रपती शिवाजी महाराजांना गुप्तधन सापडले व त्या गुप्त धनाचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड किल्ला बांधण्यात केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य वाढत असल्यामुळे आदिलशहाने त्यांना आळा घालण्यासाठी शहाजीराजांना अटक केली.
आदिलशाहीने फतेखान नावाच्या सरदाराला 5000 सैन्यासोबत पाठवून छत्रपती शिवाजी महाराजांना आळा घालण्यासाठी पाठवले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी फते खानाचा पराभव पुरंदर किल्ल्यावर केला.
बाजी पासलकर यांनी फत्तेखानाचा पाठलाग करत सासवड पर्यंत आले आणि सासवडच्या लढाईत बाजी पासलकर यांना मरण आले.
छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक :
शिवाजी महाराज यांनी आपल्या अनेक मोहिमेद्वारे मोठ्या प्रमाणावर जमीन आणि संपत्ती मिळविली होती, परंतु औपचारिक पदवी नसतानाही, ते तांत्रिकदृष्ट्या मुघल जमिनदार किंवा विजापुरी जहागीरदाराचा बंडखोर मुलगा म्हणून ओळखल्या जात होते.
छत्रपती संभाजी महाराज :
छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे राज्याभिषेक :
छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु :
छत्रपती शिवाजी महाराज किती वर्षे जगले?
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला?
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला?
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी पहिला किल्ला कोणता जिंकला?
छत्रपती शिवाजी महाराज यांनी पहिला किल्ला तोरणा जिंकला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला?
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी किती होत्या?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 8 पत्नीचे नाव (सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई,सकवारबाई, लक्ष्मीबाई, सगणाबाई, गुणवंतीबाई) हे आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म व मृत्यू कधी झाला?
छत्रपती शिवाजी महाराज किती वर्षे जगले?
छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्षे जगले.
कोसारे महाराज ( संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष )
मानव हित कल्याण सेवा संस्था पुढे वाचा
You May Also Like
- https://www.kosaremaharaj.com/2022/12/apply-online-for-membership-of-mhkss.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/12/donate-to-support-us.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/12/kosare-maharaj-orphan-ashram-and-old-age-home.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/11/Kosare-Maharaj-Mahavidyalaya.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/11/svachchhata-ka-mahatv.html
--
Kosare Maharaj |
|
0 Comments
Hello friends please spam Comments na karen, aapko Post kaisi lagi aap jarur batayenge aur post share jarur kare