स्वच्छता हे कोणाच्या दबावाखाली येऊन करण्यासारखे काम नाही आहे.

परिसर स्वच्छ ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे. परिसर स्वच्छता एकदाच करून भागणारी गोष्ट नाही तर सतत चालणारी प्रक्रिया आहे.

 

स्वच्छता हे कोणाच्या दबावाखाली येऊन करण्यासारखे 

काम नाही आहे.




          नेहा अपार्टमेंट रामकृष्ण नगर उमरेड रोड नागपूर येथील स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात आले आणि संपूर्ण फ्लैट धारकांनी स्वच्छता अभियान ला प्रतिसाद दिले कोसारे महाराजांनी स्वच्छता अभियान विषयी पुढे माहिती सांगितले की घराची व परिसराची स्वच्छता हे आरोग्याचे महत्त्वाचे अंग आहे. यातले बरेचसे प्रश्न हे निकृष्ट राहणीमान असल्यामुळे निर्माण होत असतात. याबद्दल समाजामध्ये जाणीव जागृती करणे महत्त्वाचे आहे. परिसर स्वच्छतेचे महत्त्व हे जाणून घेत असतानाच अस्वच्छतेमुळे अनेक रोग आजार होतात हे लक्षात येते. सांडपाण्याची व्यवस्था नसल्यामुळे सगळीकडे घाणीचे साम्राज्य निर्माण होते व अशा अस्वच्छतेमुळे डासांची निर्मिती होते.


आरोग्य


           वैयक्तिक स्वच्छते इतकेच परिसर स्वच्छतेला महत्त्व आहे. आपले घर व त्याचा परिसर स्वच्छ ठेवले तरच आपल्या फ्लॅटच्या चा परिसर व घरच्या लोकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते ६०% आजार किंवा रोग सुरक्षित/ शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या व योग्य परिसर स्वच्छतेच्या अभावामुळे होतात.



परिसर स्वच्छ




     परिसर स्वच्छ ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे. परिसर स्वच्छता एकदाच करून भागणारी गोष्ट नाही तर सतत चालणारी प्रक्रिया आहे. आपण आपले घर, परिसर, स्वच्छ ठेवले तर नक्कीच रोगराईपासून बचाव होऊ शकतो. आपल्याला चांगले जीवन जगता येईल.

निरोगी




          स्वच्छता हे कोणाच्या दबावाखाली येऊन करण्यासारखे काम नाही आहे. आपल्या निरोगी आणि स्वस्त जीवनासाठी ही एक चांगली सवय आहे. चांगल्या आरोग्यासाठी सगळ्या प्रकारचे स्वच्छता आवश्यक आहे मग ती स्वतःची व्यक्तिगत का असेना, आपल्या आजूबाजूच्या परिसरातील, पर्यावरणाची, पाळीव प्राण्यांची काम करण्याची जागा जसे फ्लैट घर इत्यादी ठिकाणी स्वच्छता ठेवायला पाहिजे. आपण सर्वांनी स्वतःच्या बाबतीत जागृत असले पाहिजेत. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये स्वच्छता कायम असली पाहिजे. आपल्या रोजच्या सवयी मध्ये स्वच्छता अंगीकारली पाहिजे.



स्वच्छतेचे महत्व




           पैसाच आठवणी एक चांगली सवय आहे ती स्वच्छ पर्यावरण आणि आदर्श जीवन शैली विकसित होण्यासाठी प्रत्येकाने लावून घेतली पाहिजे. आपले पंतप्रधान यांनी स्वच्छता अभियान सुरू केले आहे हे आपणास माहीत असेल जसे की स्वच्छ भारत 2014 आपल्याला ही गोष्ट लक्षात यायला पाहिजेत स्वच्छता हे केवळ सरकारचे काम नसून ते समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नैतिक जबाबदारी आहे. आपण सर्वांनी निरोगी जीवनाकरता या अभियानामध्ये सहभागी होऊन समृद्ध राष्ट्र निर्मितीला हातभार लावला पाहिजे. आणि याची सुरुवात स्वतःच्या घरापासून इत्यादी ठिकाणी बेपक स्वरूपात क्रांती रूपाने करायला पाहिजेत. आपल्या सर्वांच्या निरोगी आयुष्य आणि जीवनासाठी या अभियानाचा भाग होऊन स्वच्छतेच्या क्रांती रुपी जागृती मध्ये सहकार्य केले पाहिजे. आपल्या सर्वांनी स्वच्छता हेच ध्येय, त्याचे महत्त्व गरज समजून घेतली पाहिजे आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये स्वच्छतेला याचे स्थान दिले पाहिजे, फ्लैट असो की घर असो इत्यादी ठिकाणी जनजागृती करून स्वच्छते करता प्रचार करावा लागत आहे



स्वच्छता हे पुण्याचे काम आहे



स्वच्छता हे असे काही काम नाही जे पैसे कमवण्यासाठी केले जाऊ शकेल ही चांगली सवय आहे जी जर आपण लावून घेतली त्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये निरोगी आणि स्वस्थ जीवन साकार करण्यास मदत होईल. स्वच्छता हे पुण्याचे काम आहे त्यामुळे जीवनात आपल्याला जगण्याचा स्तर वाढवण्यासाठी, एका मोठ्या जबाबदारीचा रुपात प्रत्येक व्यक्तीने या सभेचे अनुकरण करायला पाहिजे. आपण आपली व्यक्तिगत स्वच्छता तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला पाहिजेत. वृक्षतोड कधीही केली नाही पाहिजेत पर्यावरण संतुलन कायम राखण्यासाठी वृक्षारोपण केले पाहिजे

हे काही कठीण कार्य नाही आहे, परंतु जागृती पूर्वक एकत्रित होऊन आपण करायला पाहिजे. स्वच्छतेमुळे आपल्याला मानसिक शारीरिक सामाजिक आणि बौद्धिक स्वास्थ लाभते. सर्वांसोबत एकत्रित होऊन किल्ले काम एका मोठ्या संघटनांमध्ये परिवर्तित होते.

 

कोसारे महाराज :- संस्थापक व राष्ट्रीय अध्य्क्ष
मानव हित कल्याण सेवा संस्था नागपुर

 

हमारी वेबसाइट में आपका स्वागत हैं

https://www.kosaremaharaj.com

You May Also Like 

--


Post a Comment

0 Comments