खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो : Kosare Maharaj

 


विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील? कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा. अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे  म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे. थोडे दुःख सहन करुन दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. प्रसिध्दी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही. खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो. स्वप्न पाहतच असालं तर मोठीच पाहा. लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात. आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात. जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात. कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही. जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा. मन ओळखणाऱ्यांपेक्षा  मन जपणारी माणस हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी. जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका.कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय. आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो, माशाप्रमाणे, समुद्रात पोहायला शिकलो पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का? डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं. आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.
( कोसारे महाराज ) 


Post a Comment

0 Comments