धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
समाजातील वंचित आणि शोषितांच्या जीवनात प्रवर्तन घडवून आणणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
धम्मचक्र प्रवर्तन दिन का साजरा केला जातो :
धम्मचक्र प्रवर्तन दिन किंवा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन हा भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख बौद्ध सण आहे. बौद्ध धर्मीयांद्वारे हा उत्सव दरवर्षी अशोक विजयादशमी आणि/किंवा १४ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे तसेच स्थानिक बौद्ध स्थळांवर साजरा केला जातो. महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातील लक्षावधी बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तनदिनी नागपूरला येतात. ह्या उत्सवाची पार्श्वभूमी एक बौद्ध धर्मांतरण सोहळा आहे, अशोक विजयादशमीला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्मात प्रवेश केला आहे. भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचे चक्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गतिमान करत "धम्मचक्र प्रवर्तन" केले; तेव्हापासून हा दिवस "धम्मचक्र प्रवर्तन दिन" म्हणून साजरा केला जातो. तथापि, या सणाला "धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन" असेही म्हटले जाते.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाची माहिती :
बौद्ध धर्मीय 14 ऑक्टोबर हा दिवस खास आहे कारण हा दिवस अनेकांसाठी बौद्ध धर्मांतरण सोहळाची आठवण करून देणारा आहे. अशोक विजयादशमीला म्हणजेच 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर येथील दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या काही सोबती, अनुयायींसोबत नवयान बौद्ध धर्म स्वीकारला होता. बौद्ध धर्मियांच्या मान्यतांनुसार, भारतामध्ये लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचं चक्र बाबासाहेबांनी गतिमान करत 'धम्मचक्र प्रवर्तन' केले म्हणून हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखला जातो.
धम्मचक्र विषयी माहिती :
धम्मचक्र (पाली: धम्मचक्क; संस्कृत: धर्मचक्र) हे बौद्धधर्माचे प्राचीन काळापासूनचे एक प्रमुख प्रतीकचिह्न आहे. अष्टांगिक मार्गाचे हे चिह्न आहे. हे प्रगती व जीवनाचे प्रतीक सुद्धा आहे. बुद्धांनी सारनाथ मध्ये जो प्रथम धर्मोपदेश दिला होता त्याला धम्मचक्र प्रवर्तन म्हटले जाते.
बौद्ध धर्माची माहिती :
बौद्ध धर्म हा निरीश्वरवादी, अनात्मातावादी, समतावादी, विज्ञानवादी, मानवतावादी धर्म होय. गौतम बुद्ध यांनी मानवजातीला प्रज्ञा, शील, करुणा या तत्त्वांची शिकवण दिली. बौद्ध धर्म हा स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, करुणा, मैत्री (प्रेम), प्रज्ञा, मानवी मूल्ये, विज्ञानवाद या तत्त्वांचा पुरस्कर्ता आहे.
You May Also Like
- https://www.kosaremaharaj.com/2022/12/apply-online-for-membership-of-mhkss.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/12/donate-to-support-us.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/12/kosare-maharaj-orphan-ashram-and-old-age-home.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/11/Kosare-Maharaj-Mahavidyalaya.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/11/svachchhata-ka-mahatv.html
0 Comments
Hello friends please spam Comments na karen, aapko Post kaisi lagi aap jarur batayenge aur post share jarur kare