प्रत्येक नागरिकाने आप आप आपल्या घरासमोर पाच पाच झाडे लावली पाहिजे आणि त्याला पाणी टाकण्यापासून जॊपासणी पण केली पाहिजे कारण कि जागो जागी सिमेंट रोड बनल्यापासून अशी गर्मी नेहमीच राहणार आहेच जर कितीही पाऊस पडेल अशी गर्मी राहणारच आहे एक झाड तोडले की त्याबदल्यात त्याच परिसरात पाच झाडे लावणे आता बंधनकारक आहेच यांची आम्ही सर्व नागरिकाने आप आप आपल्या घरासमोर झाडे लावण्याची जावबदारी घेण्याची आता गरजेची झाली आहे जितके ग्रीन सिटी राहील तितकेच पाऊस पडेल आणि आम्हाला पाणी वापरायला मिळेल पाण्याला जीवन असे म्हटले जाते. म्हणजे पाणी जीवनासाठी आवश्यक असते, हा त्याचा एक अर्थ झाला. पिण्यासाठी आपल्याला पाणी लागते. शरीरशुद्धीसाठी, अंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, भांडी धुण्यासाठी म्हणजेच अनेक नित्योपयोगी गोष्टींसाठी पाणी लागते.पाणी बचतीचे उपाय
* घरातील नळांची गळती अजिबात होऊ देऊ नये. थेंब थेंब गळणाऱ्या नळातून दिवसाला ३० ते ४० लिटर पाणी वाया जाते याचे भान राखणे महत्त्वाचे आहे. त्वरित उपाययोजना करून ही गळती थांबवावी.
* शॉवरमुळे पाण्याची बचत होते, पण त्याखाली तासन्तास उभे राहू नका व पाण्याचा अपव्यय टाळा. पाण्याच्या मीटरवर नीट लक्ष ठेवून आपले पाणी वाया जात नाही ना, याची दक्षता घ्या. आपले वाहन धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा मुक्तहस्ताने वापर करू नका. पावसाचे पाणी जेव्हा शक्य असेल तेव्हा त्यासाठी जरूर वापरा.
* इमारतींच्या गच्चीवर पावसाचे पाणी पडते त्याला वाट करून देऊन ते जमिनीत मुरविले तर पुढचे ६-७ महिने तेच पाणी नलिकाकूप विहिरीतून वापरता येईल. इमारतीची गच्ची ४० मी. ४० मी. असेल तर नागपूरच्या पावसात चार महिन्यांत ३२ लाख लिटर पाणी जमिनीत मुरवता येईल!
* दात घासताना किंवा दाढी करताना नळ चालू ठेवू नका. भाज्या किंवा फळे धुताना नळाखाली न धुता जर त्यासाठी परात किंवा भांडय़ाचा वापर केला तर ते पाणी फेकून न देता झाडांसाठी वापरता येईल. इमारतीच्या आवारातील झाडे तेथे वास्तव्य करणाऱ्या सदस्यांनी दत्तक घ्यावीत व त्यासाठी पाण्याचा असा उपयोग करावा. कुकरमधील पाण्याचा वापरदेखील असाच करता येईल. तांदूळ धुतल्यानंतरचे पाणी वनस्पतींना पोषक असते म्हणून ते त्यासाठीच वापरा.
* पाण्याच्या बाटल्या अर्धवट पिऊन तशाच टाकून देऊ नका. निसर्गाची ती एक मोठी प्रतारणा आपण करीत आहे व म्हणूच तो अक्षम्य गुन्हा आहे. पाणी संपणार नसेल तर आजूबाजूच्या झाडांना घाला व त्यांचा दुवा मिळवा. कपडे धुण्यासाठी धुलाई यंत्र वापरत असाल तर त्याचा वापर पूर्ण क्षमतेनेच करा. आठवडय़ातून दोन-तीन दिवसच त्याचा वापर तारतम्याने केला तर ऊर्जा व पाणी या दोन्हीची चांगली बचत होऊ शकते.
* न्हाणीघरातील व स्वयंपाकघरातील पाणी ऑक्सिडेशन करून बागेसाठी व शौचालयाच्या टाक्यांसाठी वापरता येईल. यासाठी तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध आहे.
* इमारतींच्या आवारात जर बाग वाढविली असेल तर दिवसा त्यावर एका विशिष्ट जातीचे प्लास्टिक अंथरून पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग कमी करता येतो. अर्थात त्यासाठी सदस्यांना थोडे कष्ट करावे लागतील अथवा माळ्याला उचलून पसे द्यावे लागतील. आवारातील झाडांना ठिबक पद्धतीने (पाण्याच्या बाटलीला छोटेसे छिद्र पाडून) पाणी दिले तर पाण्याची बचत होईल. झाडाच्या बुंध्याजवळ जर नारळाच्या शेंडय़ा किंवा मॉस ठेवले तर पाणी कमी वापरावे लागेल.
( कोसारे महाराज )
0 Comments
Hello friends please spam Comments na karen, aapko Post kaisi lagi aap jarur batayenge aur post share jarur kare